घर असाव घरासारख, चार भिंतीच्या आत
पण उमगत नाही, प्रेमाच नात कोणत त्यात
कधी रागावणारी, रागाने मारणारी
मग प्रेमाने पाहणारी, आई हवी त्यात
लवकर जाणारे, उशिराने येणारे
नवे यश देणारे, बाबा हवे त्यात
चुका काढणारी, पण समजावणारी
प्रेमाने सांगणारी, ताई हवी त्यात
खूप मस्ती करणारा, कधी खूप हसवणारा अन सर्वाना आवडणारा, दादा हवा त्यात
चार भिंतीना आधार देणारे चार खांब असतात
प्रेमाच्या गमती जमाती घडती उंबरठ्याच्या आत
- जुई