Tuesday, 21 July 2020

४. उन्हाळा आला


उन्हाळा आला उन्हाळा आला
लोकांचा जीव कासावीस झाला 

एसी आणि कुलर आले प्रत्येकाच्या घरी
स्वप्नात सुद्धा येऊ लागल्या पावसाच्या सरी 

थंडाव्याची ठिकाणे झाले आता हाऊस फुल
प्रत्येकाच्या तोंडी फक्त थंड आणि कुल 

घामोळ्याची पावडर आली प्रत्येकाच्या हाती
कडक उन्हात सुकून गेली पाने, फुले, पाती 

आमरस आणि पन्हे पिऊन जीव झाला गार
तीन महिने सूर्याचा राग येई फार 

लोड शेडींगचे नियम लगेच होतील आता सुरु
बारा तास लाईट नाही तर बील कसलं भरू 

सुट्टी आहे म्हणून मौज घेता येईना
पंख्याखाली बसलो तरी वेळ काही जाईना 

कुल्पी आणि आईस्क्रीमसाठी लांबच लांब रांगा
हा उन्हाळा संपेल कधी आता कुणीतरी सांगा  

- जुईली अतितकर
( 7th)

No comments:

Post a Comment

१. घर असाव घरासारख

घर असाव घरासारख, चार भिंतीच्या आत पण उमगत नाही, प्रेमाच नात कोणत त्यात  कधी रागावणारी, रागाने मारणारी मग प्रेमाने पाहणारी, आई हवी त्यात  लवक...