Tuesday, 21 July 2020

४. उन्हाळा आला


उन्हाळा आला उन्हाळा आला
लोकांचा जीव कासावीस झाला 

एसी आणि कुलर आले प्रत्येकाच्या घरी
स्वप्नात सुद्धा येऊ लागल्या पावसाच्या सरी 

थंडाव्याची ठिकाणे झाले आता हाऊस फुल
प्रत्येकाच्या तोंडी फक्त थंड आणि कुल 

घामोळ्याची पावडर आली प्रत्येकाच्या हाती
कडक उन्हात सुकून गेली पाने, फुले, पाती 

आमरस आणि पन्हे पिऊन जीव झाला गार
तीन महिने सूर्याचा राग येई फार 

लोड शेडींगचे नियम लगेच होतील आता सुरु
बारा तास लाईट नाही तर बील कसलं भरू 

सुट्टी आहे म्हणून मौज घेता येईना
पंख्याखाली बसलो तरी वेळ काही जाईना 

कुल्पी आणि आईस्क्रीमसाठी लांबच लांब रांगा
हा उन्हाळा संपेल कधी आता कुणीतरी सांगा  

- जुईली अतितकर
( 7th)

५. पाढे पाठ



बे एके बे, बे दुने चार
नको मोटार कार
प्रदूषण फार 

बे त्रिक सहा बे चोक आठ
नदीच्या पात्रात
कचरा काठोकाठ 

बे पंचे दहा बे सक बारा
शुद्ध आणि स्वच्छ वारा
जपूया निसर्गाचा खजिना खरा 

बे साती चौदा, बे आठी सोळा
वीज वापर टाळा
नाहीतर लोड शेडींग पाळा 

बे नवे अठरा बे दाहे वीस काढा
हे गाणे ऐकल्यावर 
पाठ झाला बे चा पाढा 

- जुईली अतितकर
( 5th)

६. दिव्यांची दिवाळी


आनंदाची गाणी सर्वांच्या गळी
आली हो आली दिव्यांची दिवाळी 

मांगल्याच्या लहरीवर मानाचा वारसा
दिवाळीच्या शुभ मुहूर्ती दिवा मात्र हवासा 

नवा प्रकाश तेज नवा
विजवू नका हो एकतेचा दिवा 

अंगणात लावली प्रकाशमय करिसी
मातीची पणती आनंदाच्या ज्योती 

संस्काराच्या पानावर संस्कृतीच्या ओळी
विसरू नका मनात ठेवा फक्त दिव्यांची दिवाळी 

- जुईली अतितकर
( 9th std )

३. चक्रम शाळा


अक्रम जंगलात चक्रम शाळा
मास्तरांचे नाव पोपट भोला 

मास्तर शिकवतात भाषा छान
बाराखाडीचा ठेऊन मान 

असते गणिताची आकडेमोड
बरोबर गणिताला शाबासकी गोड 

विज्ञान तासाला छान प्रयोग
कवीळ, मलेरिया साथीचे रोग 

इतिहास तासाला मोठे युद्ध
कधी महावीर कधी बुद्ध 

भूगोल शिकवतात मास्तर सुंदर
कधी दक्षिण तर कधी उत्तर 

शेवटचा विषय चित्रकला
चित्राची वही आता खोला 

शाळेत मास्तरांची मान मोठा
शाळा सुटली चला सुटा 

- जुईली अतितकर
( 7th)

Sunday, 19 July 2020

२. परीक्षा



परीक्षा आल्या जवळ सुरु डोकेदुखी
आभ्यासाला परीक्षेने बांधली घट्ट राखी 

पेपरचे वेळापत्रक लागले आता माथी
तोच त्रास सुरु आता दिवस अन राती 

परीक्षेच्या आदल्या दिवशी शिक्षकांचा धाक
पाठांतराची सारखी सारखी ऐकू येते हाक 

बारा धडे नि आठ कविता कसा करू अभ्यास
किती मिळतील मार्क आणि कसे होऊ पास 

स्वप्नातही वाटे मला परीक्षेची भीती
कधी संपेल परीक्षा अन कधी मिळेल मुक्ती 

परीक्षा एकदा संपली कि निकालाची चिंता
मिळेल आता शाबासकी कि मिळेल धपाटा 

मनासारखे हवे तसे गुण कधी मिळतील
आमच्या जीवनातून परीक्षा कधी संपतील 

- जुईली अतितकर
( 7th)

१. घर असाव घरासारख

घर असाव घरासारख, चार भिंतीच्या आत पण उमगत नाही, प्रेमाच नात कोणत त्यात  कधी रागावणारी, रागाने मारणारी मग प्रेमाने पाहणारी, आई हवी त्यात  लवक...